चाळीसगावात शहीदांच्या स्मरणार्थ २६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव शहर पोलिस व सत्यम रक्तदाता ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमाने २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्ममणार्थ २६ नोव्हेंबर रोजी येथील पोलिस स्थानकात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले असून, यात शिबिरात जास्तीत जास्त तरूणांनी सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी केले आहे.

सविस्तर असे की, मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी आतंकवादी यांनी भ्याड हल्ला केला. यात पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. परंतु, यात अनेक निष्पाप जवानांना आपले जीव गमवावे लागले. यामुळे त्यादिवसाची आठवण राहावी, यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात शहर पोलिस व सत्यम रक्तदाता ग्रृप यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच २६ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शिबिरात यांनी उपस्थिती 

अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर उत्साहात पार पडणार आहे. त्यामुळे चाळीसगावातील जास्तीत जास्त तरूणांनी शिबिरात सहभागी नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी केले आहे.
बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज