जळगाव शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरात मंगळवार दि.३० रोजी मोफत अस्थिरोग व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि रेडप्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.३० रोजी शहरातील रामेश्वर कॉलनीतील राज माध्यमिक विद्यालय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरात अस्थिरोग चिकित्सक डॉ. योगेंद्र नेहेते यांच्या उपस्थितीत हाडांचा ठिसुळपणा, रक्तातील शुगर, रक्तदाब, वजन व उंची व अत्यंत अल्प दरात थायरॉईडची तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे समन्वयक जितेंद्र गवळी, रेडप्लस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. मोईज देशपांडे, सह-समन्वयक भावेश ढाके यांनी दिली आहे.

शिबीराचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी ९५४५०१०४४०, ९१३०९९६०१५ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी व या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -