जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । जिल्हास्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे ३० जुलै ते २ ऑगस्ट, २०२१ दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी एसएससी/एसएचसी/ग्रॅज्युएट/डिप्लोमा आयटीआय पात्रतेची एकूण २०० रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.

या मेळाव्यात पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगईन करुन ॲप्लाय करावा.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९०  वर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे मेळावा ऑनलाईन असल्याने उमेदवारांनी कार्यालयात अथवा नियोक्त्याकडे प्रत्यक्ष उपस्थित राहू नये. असे आवाहन डॉ. राजपाल कोल्हे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -