fbpx

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची जिल्हास्तरीय बैठक शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

बैठकीचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्या हस्ते होणार असून राज्य संघटना मार्गदर्शक राम जगदाळे, राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल, प्रदेश कार्याध्यक्ष तथा रत्नागिरी जि.प.चे उपाध्यक्ष उदय बने, राज्य उपाध्यक्ष जय जाधव, अमृता पवार, जळगाव जि.प.चे उपाध्यक्ष लालचंद पाटील, राज्य संघटक संजू वाडे, दिनकर पाटील, राज्य सरचिटणीस सुभाष घरत, उद्योजक देवेंद्र खडसे, असोसिएशनचे धुळे जिल्हाध्यक्ष पोपटराव सोनवणे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजन भोजने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, शिक्षण तथा आरोग्य सभापती रवींद्र पाटील, महिला बाल कल्याण सभापती ज्योती पाटील, कृषी पशु संवर्धन सभापती उज्वला म्हाळके आदी उपस्थित राहणार आहेत.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज