fbpx

जळगाव ते शेगाव सायकल वारीचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ ऑक्टोबर २०२१ । जळगाव येथील श्री संत गजानन भक्त परिवार व हनुमान आखाडा, शाहूनगर यांच्यातर्फे जळगाव ते शेगाव सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.८ रोजी हनुमान आखाडा येथून वारीचे शेगावकडे प्रस्थान होणार आहे.

दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री संत गजानन भक्त परिवार व शाहू नगरातील हनुमान आखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव ते शेगाव वारीचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनासारख्या महाभयंकर रोगापासून सर्वांना मुक्त करण्यासाठी सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कोरोनापासून सर्वांना मुक्त कर’ असे साकडे श्री संत गजानन महाराजांना घालणार असल्याचे माजी नगरसेवक विजय वाडकर यांच्याकडून सांगण्यात आले. शुक्रवार दि.८ रोजी सकाळी ८ वाजता हनुमान आखाडा, शाहूनगर येथून वारीचे शेगावकडे प्रस्थान होणार आहे. भाविकांनी या सायकल वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगरसेवक विजय वाडकर व पैलवान सागर सोनवणे यांनी केले आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज