fbpx

महिलांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी उद्या ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ ऑगस्ट २०२१ । महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) आणि महिला व बाल विकास विभाग, आयुक्त कार्यालय, पुणे यांच्या सहकार्याने महिला, युवतींना पहिल्या पिढीचे यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ऑनलाईन उद्योजकता परिचय वेबीनार दिनांक 6 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित केलेला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला उद्योजकता धोरण आणि महिला उद्योजकता कक्ष या अंतर्गत उद्योजकता परिचय उपक्रम गूगल मीट द्वारे आयोजित केलेला आहे. महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण आणि महिला उद्योजकता धोरण या उद्देशाने या ऑनलाईन उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

इच्छुक महिला युवती यांनी आपले संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, प्रस्तावित उद्योग याची माहिती [email protected] या ईमेलवर अथवा ईमेल आयडी नसल्यास व्हॉट्स अप ९४०३०७८७५२/ ९४०३१३१२९२ अथवा एसएमएस ७०४५१७२७३६/७४००११०५८० द्वारे या क्रमांकावर पाठवावी. असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

माहिती प्राप्त झाल्यानंतर गूगल मीट लिंक तात्काळ पाठविण्यात येईल. सर्व इच्छुक महिला, युवती उमेदवार आणि भावी यशस्वी महिला उद्योजक यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सौ. भारती सोसे, राज्य समन्वयक, महिला उद्योजकता विकास कक्ष, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, औरंगाबाद यांचेशी ९४०३६८३१७३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज