वन्यजीव सप्ताहानिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषेचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । निसर्गमित्र जळगावतर्फे वन्यजीव सप्ताहानिमित्त महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन वन्यजीव प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले असून या प्रश्नमंजुषेमध्ये सर्व वयोगटातील वन्यजीव प्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

वन्यजीव सप्ताहानिमित्त निसर्गमित्र, जळगावतर्फे दि. २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान, महाराष्ट्रव्यापी ऑनलाईन वन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्नमंजुषा सर्व वयोगटासाठी खुली असून सर्व उत्तरे बरोबर असणार्‍यांना विशेष प्रमाणपत्र तर अन्य सहभागींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे, प्रमाणपत्र आपण नोंदवलेल्या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवण्यात येणार आहे, प्रश्नमंजुषा २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत सोडवायची असून ८ ऑक्टोबरपर्यंत भाग घेणार्‍या स्पर्धकांनाच फक्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच ज्यांनी मराठी भाषेमध्ये नाव नोंदविले असेल त्यांनाच प्रमाणपत्र पाठवले जाईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केले आहे.

अशी करा नाव नोंदणी
वन्यजीव सप्ताहाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या जयंतीला होत आहे. “निसर्ग सर्वांच्या गरजा पुरवण्यास समर्थ आहे, पण कोणाचीही हाव पुरी करण्यास नाही’ हा महात्मा गांधी यांनी दिलेला संदेश आपल्याला अर्थनीती सोडण्याचा संदेश देतो. हा संदेश स्वीकारला तरच निसर्ग संपत्ती व पर्यावरण वाचवता येईल आपले वन्यजीवन वाचवता येईल. वन्यजीवनाचे संवर्धन, जतन करण्यासाठी वन्यजीवन जाणून घेण्याची गरज आहे. या दृष्टीने आम्ही ही प्रश्नमंजुषा घेतली असल्याचे पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले. प्रश्नमंजुषेच्या लिंकसाठी व्हाट्सएप क्रमांक ८९९९८०९४१६ वर आपली नोंदणी करावी, असे आवाहनही श्री व सौ. गाडगीळ यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज