fbpx

नवीन मतदारांसाठी शनिवारी शिबिराचे आयोजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२१ ।  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत असून नवीन मतदार नोंदणी करताना एकल (Unique) मोबाईल क्रमांक नोंदविलेल्या मतदारांना e-EPIC डाऊनलोड करण्यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत शनिवार, 14 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मदतीने संबंधित मतदान केंद्रावर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यासाठी पात्र मतदारांची यादी BLO यांना उपलब्ध करुन देण्यात आलेली असून 14 ऑगस्ट, 2021 रोजी शिबीराव्दारे तसेच जानेवारी, 2021 नंतर नोंदणी केलेल्या नविन मतदारांशी व्यक्तीगत संपर्क साधून जिल्ह्यातील 9 हजार 292 मतदार BLO यांचे मदतीने एकाचवेळी e-EPIC  डाऊनलोड करणार आहेत.

तरी जळगाव जिल्ह्यातील पात्र मतदारांनी 14 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांच्या मदतीने e-EPIC डाऊनलोड करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज