परिषदेत आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा होणार सखोल अभ्यास; विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक होणार मोठ्या संख्येने सहभागी!
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । शहरातील जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातर्फे तसेच आयइआय चाप्टर नाशिक, कोग्निडो.एआय, इंडेस व स्पारफीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ व २४ सप्टेंबर रोजी “एआय इंटरनॅशनल समिट २०२२” या शीर्षकाखाली दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी आज बुधवारी पत्रकार परिषेद दिली.
सदर राष्ट्रीय परिषदेचा मुख्य विषय “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” हा असून या मुख्य विषयावर राष्ट्रीय परिषदेत विचार मंथन होणार आहे. या परिषदेतील पहिल्या उद्घाटकीय सत्रात व बीजभाषक म्हणून मल्टिप्लाय वेंचरचे सहसंस्थापक भूषण पाटील हे “एआय न्यू रिटेल मार्केटिंग” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परिषदेच्या दुसऱ्या सत्रात “कॉम्प्युटर विजन इन एआय व प्रॅक्टिकल स्वरम इन इंटेलिजन्स इन एआय” या विषयावर प्रख्यात मावेनीर सिस्टीमचे वरिष्ठ सदस्य दीपक प्रधान, आयआयआयटी पुणे येथील प्रा. डॉ. अमृता लिपारे व सुरत येथील एसव्हीएनआयटीचे प्रा. डॉ. प्रशांत शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर परिषदेत स्पार्टीफिशियल इनोवेशनचे ट्रेनर सुधीर साजन, इंडिज सोल्युशनचे संचालक अभीज्ञानम गिरी, इंडेज सोल्युशनचे सॉफ्टवेअर डिझाईन अभियंता रोहित कुकरेजा, भारतसाॅफ्ट सोल्युशनचे संचालक योगेश मुरूमकर, मुंबईतील व्हीजेटीआयचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संदीप एस. उदमले व आदि क्षेत्रातील मार्गदर्शक हे या दोन दिवसीय परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विविध राज्यामधून अनेक प्राध्यापक व विद्यार्थी या परिषदेस उपस्थित राहणार असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स समोरील वर्तमान आव्हाने आणि प्रश्नांच्या संदर्भात या परिषदेत विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक व या विषयात कुतूहल असणाऱ्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या राष्ट्रीय परिषदेचे संयोजक व रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी केले आहे.