माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । सर्वसामान्य नागरिकांमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी मंगळवार २८ रोजी माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिनानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज