fbpx

जळगाव जिल्ह्यात शनिवार, रविवारी ‘ही’ दुकाने राहणार सुरु

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ ।  जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यामुळे १ जूनपासून निर्बंध शिथील करण्यात आले असून त्यात सर्वच दुकाने सकाळी ९ ते २ दरम्यान सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र शनिवार व रविवार दोन दिवस इतर दुकाने बंद राहतील, या दोन दिवशी फक्त अत्यावश्‍यक सेवेतील दूकाने सुरू राहणार आहेत. तसे आदेश काढण्यात आले आहे. दुकाने बंदच्या पार्श्वभूमीवर आज सेंट्रल फुले मार्केट, फुले मार्केट सह सर्वच व्यापारी संकूलात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

अखेर अनलॉकची अधिसूचना आलीच… ७ जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार…

शासनाच्या निर्देशानूसार ज्या जिल्‍ह्‍यात कोरोना रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट दहा टक्क्यांच्या आत आहे; तेथे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यात जळगावचाही सामावेश होता. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी निर्बंध शिथील करीत सर्वच दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सलून, ब्यूटीपार्लर, स्पा वगळता इतर सव दुकाने सकाळी ९ ते दूपारी २ दरम्यान सुरू आहेत. शनिवार व रविवारी मात्र इतर सर्व दुकाने बंदचे आदेश आहेत. यामुळे आज बाजारपेठेत इतर दुकानात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

शहरातील फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटमध्ये आज बंदच्या पार्श्वभूमीवर महिलांची खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. हॉकर्सनी रस्त्यावरच दुकाने थाटली होती, त्यातच वाहनधारकांनी वाहनेही रस्त्या लावल्याने महिलांना रस्त्यावर चालताही येत नव्हते. मात्र खरेदी तर गरजेची होती. यामुळे महिला मिळेल त्या ठिकाणावरून हव्या असलेल्या वस्तू खरेदी करीत होत्या. बाजारात होणारी गर्दी पाहता कोरोनाला कसे नियंत्रणा ठेवणार असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज