जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२१ । राज्यभरात कोरोना पुन्हा डोकंवर काढलं आहे. जळगाव जिल्ह्यात देखील कोरोना बाधितांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. यामुळे प्रशासनही चिंतेत आहे. अशातच जळगावमधील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी कठोर निर्बंध लादले आहेत.
करोनाच्या लसीचे दोन डोस घेतले असतील तरंच नागरिकांना जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटता येणार आहे. विशेष म्हणजे लस घेतलीच नसेल तर जिल्हा रूग्णालयाच्या आवारातही फिरता येणार नाही. डॉ. नागोराव चव्हाण यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, भेटण्यासाठी आलेल्यांनी जर लस घेतली नसेल तर त्यांना याच ठिकाणी लस देण्याचीही व्यवस्था जिल्हा शल्यचिकित्सकांकडून करण्यात आली आहे.
जिल्ह्यात वाढला करोनाचा प्रादुर्भाव
जिल्ह्यात ऑगस्टनंतर दुसऱ्या संसर्गाच्या लाटेतील रूग्ण संख्येची साखळी खंडीत होऊन जवळजवळ जिल्हा संसर्गमुक्त होण्याच्या मार्गावर पोहचला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा रुग्णवाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात करोना संसर्ग नियंत्रणात येत असतानाच जिल्हा बँकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनतर पुन्हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून संसर्गबाधित रूग्णसंख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून आहे.
हे देखील वाचा :
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित