१८ रेशन दुकानांसाठी होणार ऑनलाइन नोंदणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ नोव्हेंबर २०२१ । शहरातील १८ रेशन दुकानांसह ग्रामीण भागातील दुकानांच्या परवानगीसाठी ऑनलाइन नोंदणी केली जाणार असून, यासाठी अर्ज करण्याची मुदत २० नोव्हेंबरपर्यंत आहे. तसेच जाहीरनामा निघालेल्या अर्जदारांनाही अर्ज दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार नामदेव पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिले आहेत.

सविस्तर असे की, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील रेशन दुकानांच्या परवानगीसाठी ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ही नवीन संकल्पना राबवली आहे. राज्यात प्रथमच हा प्रयोग राबवला जात आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. जळगाव शहरातील १८ रेशन दुकानांसह ग्रामीण भागातील सात गावांचा समावेश आहे. दरम्यान, यासाठी अर्ज करण्याची मुदत २० नोव्हेंबरपर्यंत आहे. जाहीरनामा निघालेल्या अर्जदारांनाही अर्ज दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार नामदेव पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिले आहेत.

शहरातील दुकाने अशी

कैलास कथुरिया ( शिवाजीनगर ), गोविंद गीते ( कुंभारवाडा ), हौसाबाई माळी ( शनिपेठ ), किशोर भावसार ( रथ चौक ), किशोर महाजन ( रथचौक ), गरीब नवाज स. सौ. ( भिलपुरा ), सुभाष शहा (चौबेशाळा ), घनश्याम पाटील ( दुकान नंबर ३१ ), सुरेश कुलकर्णी ( दुकान ३२ ), जि. मा. सोसायटी (दुकान ३३), प्रकाश सूर्यवंशी दुकान (३३-२), लीलाबाई विरपणकर (दुकान ३४), सतीश महाजन (दुकान ४२), एकता ग्राहक भांडार (दुकान ४४), बनारसी लगड सिव्हिल हॉस्पिटल (दुकान ४४-१), रत्ना शिंपी (भास्कर मार्केट), दालफळ (दुकान १३-१), रामेश्वर कॉलनी (दुकान १३-१)यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज