गावठी कट्टा, धारदार चाकूसह अट्टल गुन्हेगार जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । नशिराबाद गाव आणि परिसरात एक व्यक्ती गावठी कट्टा आणि धारदार चाकू घेऊन दहशत माजविणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मो.हाशीम मो.सलीन खान वय-४१ रा.भुसावळ असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

भुसावळ येथील प्रल्हाद नगरात राहणारा मो.हाशीम मो.सलीन खान हा नशिराबाद गावात गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवीत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. निरीक्षक बकाले यांनी नेमलेल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, रवींद्र पाटील यांनी यांनी मो.हाशीम मो.सलीन खान याला नशिराबाद बस स्थानकाजवळून अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या झाडाझडतीत एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतूस व धारदार चाकू मिळून आला आहे. मो.हाशीम मो.सलीन खान हा सध्या भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात फरार असून त्याच्यावर यापूर्वी देखील इतर गुन्हे दाखल आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज