”एक झाड एक बाळ” माऊली हॉस्पीटलचा आदर्श उपक्रम

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । रावेर येथील माऊली फाऊंडेशनतर्फे एक बाळ, एक झाड हा उपक्रम सुरु करण्यात आला. प्रत्येक बाळंतणीची रूग्णालयातून उपचारानंतर घरी जातांना त्यांना एक झाड देवून ते जगविण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे कार्य माऊली फाऊंडेशनतर्फे करण्यात येत आहे.

एक झाड एक बाळ ही संकल्पना राबविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रांताधिकारी कैलास कडलग, सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी तडवी, पोलिस निरीक्षक कैलास नागरे, वनक्षेत्रपाल मुकेश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक कैलास नागरे म्हणाले की, माऊली हॉस्पीटलचे डॉ. संदीप पाटील यांनी सुरु केलेला उपक्रम हा चांगला आहे. प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाचे उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.

पर्यावरणाच समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे. डॉ. संदीप पाटील यांनी भूतलावरील प्रत्येक प्राण्याला जीवन जगण्यासाठी महत्वाचा असतो तो ऑक्सीजन. ऑक्सीजन संपला म्हणजे पृथ्वीवरील अस्तित्व संपते. निसर्गाने मुबलक प्रमाणात ऑक्सीजनची निर्मिती केली आणि त्यासाठी जे साधन उपलब्ध करून दिले ते म्हणजे वृक्ष. वृक्षांपासूनच आपल्याला ऑक्सीजन मिळू शकतो. आणि त्यासाठी आपल्या आर्थिक भुर्दंड ही बसत नाही. कुणीही, कुठेही वृक्ष लागवड करु शकतो. त्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे आहे. असेही ते म्हणाले.

वृक्षारोपणासाठी रोपे भेट
कार्यक्रमात अंकिता प्रणय चौधरी (पिंप्रीनांदू), लक्ष्मी अमोल चौधरी (ऐनपूर), नाजमीन बी शेख जहीर (रसलपूर), नयना मंगलेश पाटील (नरवेल), नयना गणेश नंबरदार (बोरसर म.प्र.), प्रसन्ना सुहास पोतदार (भुसावळ), रूपाली आशिष माळी (रावेर), फरजाना बी शेख नासीर (भोर), संगीता संदिप भालेराव (ऐनपूर), पार्थ गोकूळ शिंदे (रावेर) यांना वेगवेगळ्या प्रकारची रोपे वृक्षभेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमास ललित पाटील, राजेश भंगाळे, दीपक नगरे, विजय पाटील, डॉ. एस.आर.पाटील, राजेश शिंदे, ईश्वर महाजन, राहूल पाटील, गौरव पाटील, योगेश कुलकर्णी, भुषण पाटील, नदीम शेख, जुबेर शेख यांच्यासह रूग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -