चाळीसगावात चौघांकडून एकाला जबर मारहाण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । अज्ञात ठिकाणाहून आलेल्या अनोळखी इसमाने एकाला जबर मारहाण केल्याची घटना शहरातील पाटणादेवी रोडावर घडली असून याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथील रहिवासी कैलास चिंधा पाटील (वय-३५) शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान कैलास पाटील हा शहरातील पाटणादेवी रोडावर मित्रांसोबत उभा असताना त्याठिकाणी अचानक चार अनोळखी इसम येऊन लाकडी दांड्याने त्याच्या खांद्यावर व पाठीवर जबर मारहाण केली.

त्याचवेळी सोबत असलेला मित्र मुकूंदा गोविंद चौधरी यांनी मध्यस्थी केली असता त्यालाही चापट बुक्यांनी मारहाण करण्यात आली. हि घटना ८ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. यात कैलास चिंधा पाटील याला जबर दुखापत झाल्याने शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत तिघ्या आरोपींचे अंदाजे वय हे २० ते २२ वयोगटातील असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कैलास चिंधा पाटील याच्या जबाबावरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३२४, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भगवान उमाळे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar