अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, दोघे जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगावहून कजगावकडे जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वाघळी गावाजवळ घडली. दोघं जखमींवर चाळीसगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

कजगाव येथील रहिवासी प्रल्हाद विठ्ठल महाजन हे बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा निवृत्ती महाजन (वय-२३) व नातू भूषण रोहिदास महाजन (वय-१६) यांच्यसह चाळीसगावहून कजगावकडे दुचाकीने येत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला वाघळी गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. यात प्रल्हाद महाजन यांचा मृत्यू झाला, तर मुलगा निवृत्ती व नातू भूषण हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी चाळीसगाव येथे दाखल करण्यात आले आहे.

या घटनेने कजगाव परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रल्हाद महाजन यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते माळी समाजाचे अध्यक्ष रघुनाथ महाजन यांचे लहान ते बंधू होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज