चाळीसगावजवळ चारचाकी उलटली, एक ठार, एक जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । मालेगावाहून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील आडगाव गावाच्या शिवारात मध्यरात्रीनंतर घडली असून आहे.

मालेगावाहून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना अचानक चारचाकी क्रमांक एम.एच.४७ जी. ७०४४ वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या खाली उलटले. अपघातात ताहेर युसूफ पटेल (वय-५५) रा. मालेगाव यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. तर चालक कामरान खान नहीमखान रा. दयाणे ता. मालेगाव हा गंभीर जखमी झाला आहेत. अपघात रविवार, ८ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास तालुक्यातील आडगाव गावाजवळील फौजीच्या हॉटेलसमोर झाला आहे.

आडगाव गावाचे सरपंच रावसाहेब तोताराम पाटील यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात भादवी कलम- ३०४(अ), २७९, ३३७, २२७ व मोटार अधिनियम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुभाष गोकुळ पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -