fbpx

ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दुचाकीस्वाराला उडविले, १ ठार, १ जखमी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । पारोळा तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक ६ वर विचखेडे गावानजीक ओव्हरटेक करण्याच्या नादात असलेल्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वाराचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. रवींद्र दोधुराव पाटील (५१, वर्धमाननगर, ता. पारोळा) असे मृताचे नाव असून याबाबत ट्रक चालकाविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेश चिंतामण पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनांक २२ रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मित्र रवींद्र दोधुराव पाटील (५१, वर्धमाननगर, ता. पारोळा) मोटारसायकलने (एमएच१९/डीआर४५३७) पारोळ्याहून धुळ्याकडे जात असताना विचखेडे गावाजवळ समोरून येणारा ट्रक (एमएच १८/एम८७९९)वरील चालक रमेश सुखदेव चौधरी (फागणे, जि. धुळे) यांनी आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रक भरधाव वेगाने चालवत ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटारसायकल चालकाला जोरदार धडक दिली. त्यात रवींद्र दोधुराव पाटील यांचा मृत्यू झाला व फिर्यादी नरेश चिंतामण पाटील हे जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत ट्रक चालकाविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt