धावत्या रेल्वेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह | २९ सप्टेंबर २०२१ | धावत्या रेल्वेच्या धक्क्याने शहरातील एकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी जळगाव खूर्द रेल्वे फाटाजवळ घडली. सुरेश दौलतराम खत्री (वय-४२ रा. सिंधी कॉलनी,जळगाव) असे मृताचे नाव आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुरेश खत्री हे शहरातील सिंधी कॉलनीमध्ये पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. दरम्यान, गेल्याकाही दिवसांपासून काहीही कारण नसतांना मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी भुसावळ रोडवरील खासगी रूग्णालयात २१ सप्टेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

दरम्यान हॉस्पीटलजवळून काही अंतरावर असलेल्या जळगाव खूर्द रेल्वे फाट्याजवळ आज बुधवार सकाळी ८.३० वाजेच्या पुर्वी त्यांचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे.

याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज