fbpx

उभ्या डंपरवर दुचाकी धडकली; सावदा येथे एक ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरवर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सावदा येथे घडली आहे. लक्ष्मण पाटील (वय -६०, रा गवत बाजार, सावदा ) असे मृताचे नाव आहे.

याबाबत असे की, येथील रावेर मार्गावरील हॉटेल कुंदन जवळ काल रात्री दुचाकीवरून (क्र – एमएच १९ सी एल ७२५७) जाणारे लक्ष्मण पाटील रस्त्यावर अंधारात उभ्या असलेल्या डम्परवर धडकून ठार झाले. या दुर्घटनेत त्यांच्या दुचाकीचेही बरेच नुकसान झाले. या अपघाताबद्दल भूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात डम्पर (क्र – एम एच १९ – सी वाय – ४८७६ ) च्या चालाकाविरोधात गुर न ९६ भा द वि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्त्यावर अंधार असूनही इंडिकेटर न लावता निष्काळजीपणे वाहन उभे करून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस काराभूत ठरला म्हणून डम्पर ( क्र – एम एच १९ – सी वाय – ४८७६ ) च्या चालकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो.हे.कॉ. उमेश पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज