उमर्दे येथे दारूच्या नशेत एकाला केले जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ ।  उमर्दे ( ता. एरंडोल ) येथील अजय दत्तू वानखेडे ( वय माहित नाही ) याने दारूच्या नशेत प्रदीप दत्तू खैरनार ( वय माहित नाही ) यांच्या हातांवर विळा मारून जखमी केले. तर दीपक खैरनार व प्रदीप खैरनार या दोघांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना २१ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रदीप दत्तू खैरनार यांच्या फिर्यादीवरून येथील पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. ‌

सविस्तर असे की, फिर्यादी प्रदीप दत्तू खैरनार व त्याचा भाऊ दीपक खैरनार हे गावातील बस स्थानकाजवळ उभे होते. दरम्यान, अजय वानखेडे हा दारू पिऊन आला व दारूच्या नशेत दीपक यास शिवीगाळ करू लागला. याबाबत दिपक याने प्रदीपला सांगितले. त्याचा जाब विचारल्यावर त्याने दिपकला पकडले व चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अजय वानखेडे याचा भाऊ विजय वानखेडे हे फिर्यादीच्या घरी जाऊन प्रदीप दत्तू खैरना यांच्या हातावर विळा मारून जखमी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज