विषारी प्राशन केल्याने एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । एरंडोल तालुक्यातील खडके बु! येथे गुलाब नथ्थू पाटील (वय-५२) या इसमाने विषारी औषध सेवन केले असल्याने त्यांना मंगळवारी एरंडोल ग्रामीण रूग्णालय येथे उपचारार्थ नेण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना गुलाब पाटील यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत झुंबरसिंग पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशन ला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी हेड काँन्स्टेबल विलास पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -