fbpx

भेट अर्धातच राहिली ; मित्राच्या भेटीला निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव वाहनाने चिरडले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ । मित्राच्या भेटीसाठीसाठी जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे साईबाबा मंदिरासमोर महामार्गावर घडली. विकास भास्कर पाटील (वय ४२) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे.

विकास पाटील हे चोपडा तालुक्यातील सनपुले येथील रहिवासी आहेत. ते नोकरीच्या निमित्ताने चार ते पाच वर्षापूर्वी जळगावात स्थायिक झाले आहेत. कुटुंबासह ते जळगाव शहरातील चंदूआण्णा नगर परिसरातील शिवदत्त कॉलनी येथे भाडे करारावरील खोलीत वास्तव्यास होते. एमआयडीसीतील सिध्दार्थ कार्बो या कंपनीत ते कामाला होते.

आज मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास विकास पाटील हे बँकेच्या कामानिमित्ताने घराबाहेर पडले. बॅकेत काम आटोपून ते त्यांच्या दुचाकी क्र.एम.एच.१ सी.एल.१८९० ने कंपनीतील मित्राला भेटण्यासाठी पाळधीकडे जात होते. पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकले, यानंतर ते मित्राकडे जात असतांना पाळधी गावातील साईबाबा मंदिरासमोर महामार्गावर अज्ञात वाहनाने विकास पाटील यांना चिरडले. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt