fbpx

वंचित बहुजन आघाडीची चाळीसगाव कार्यकारणीसाठी एक रोजी मुलाखत

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । वंचित बहुजन आघाडी चाळीसगावच्या वतीने तालुका व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवार दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखती वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य व युवा महिला आघाडीच्या शमीना पाटील जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे व जिल्हा महासचिव वैभव शीरतुरे हे घेणार आहेत. तरी वंचित बहुजन आघाडीचा पदभार घेऊन काम करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी चाळीसगाव तालुका अध्यक्ष युवराज जाधव (संभाप्पा)यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज