fbpx

विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या ; खेडी शिवारातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जुलै २०२१ । विहिरीत उडी घेऊन एका ४५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी दुपारी जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात घडली. नंदलाल सुरेश गोसावी (वय-45 रा. दिनकर नगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की,  नंदलाल गोसावी हे ट्रॅक्टर चालक आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह करतात. दरम्यान, नंदलाल गोसावी यांनी शुक्रवारी त्यांच्या आई सुशिलाबाई यांना ट्रॅक्टर शोरूमला जाऊन येतो असे सांगून घरातून निघाले होते. कुणाला काहीही न सांगता त्यांनी तालुक्यातील खेडी शिवारातील मनुदेवी मंदिराजवळ असलेल्या जनार्दन खडके यांच्या शेतातील पडक्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजून आले नाही. शेतातील मजूर आज सकाळी कामावर आल्यानंतर विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने लक्षात येताच विहिरीत डोकावून पाहिले असता मृतदेह तरंगताना दिसून आला. पोलीस पाटील आनंदा बिऱ्हाडे यांनी तातडीने पोलीसांना खबर दिली. एमआयडीसी पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी ४ वाजता मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज