fbpx

डों.कठोरा येथे शेतातून पाणी नेल्याचा कारणावरून एकाला मारहाण ; गुन्हा दाखल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एका शेतमजूराला विहिरीवरून पाणी नेल्याच्या कारणावरून शेतकऱ्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवार २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर प्रभाकर पाटील (वय-४२) रा. डोंगरकठोरा ता. यावल हे शेतकरी आहे. त्यांचे डोंगरकठोरा शिवारात शेत आहे. सोमवारी २३ ऑगस्ट रोजी त्यांच्या शेतात काम करण्यासाठी काही मजूर आले होते. सकाळी १०.३० वाजता मजूर आल्यानंतर त्यांना पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी शेख पाटील हे शेजारच्या धमेंद्र प्रेमचंद पाटील रा. डोंगरकठोरा यांच्या शेतात गेले.

शेतातून पाणी आणल्याचा राग धमेंद्र पाटील यांना आल्याने त्यांनी काठीने शेखर पाटील यांना बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा शेतात दिसला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. शेखर पाटील यांनी यावल पोलीस स्टेशनला धमेंद्र पाटील यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल अशोक जवरे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज