fbpx

यावल दरोड्यातील एकाच्या मुसक्या आवळल्या, ५ जणांची नावे निष्पन्न

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२१ । यावल शहरात भरदिवसा सराफ दुकानात टाकण्यात आलेल्या दरोड्यांतील पाच गुन्हेगारांचे नावे निष्पन्न झाले आहे. त्यातील एकाला आज बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कांदीवील मुंबई येथून अटक केली आहे. निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (वय-३२) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत असे की, यावल शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत जगदीश कवडीवाले यांच्या मालकीचे बाजीराव काशीनाथ कवडीवाले नावाच्या सराफ दुकानात दरोडा टाकण्यात आल्याची घटना ७ जुलै रोजी घडली होती. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले.  भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे यावलसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. पालकमंत्र्यांनी या दरोड्याची उकल पोलीस प्रशासन लवकरच करेल अशी ग्वाही दिली होती. संशयित आरोपी हा कांदीवली येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी संशयित आरोपी निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड याला आज  कांदीवली मुंबई येथून अटक केली.

त्याची चौकशी केली असताना दरोड्यातील गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेराव रा. बोरवाला ता. यावल ह.मु. तापीकाठ स्मशानुभमी जवळ भुसावळ, सुनिल अमरसिंग बारेला रा. गोऱ्या पाडा ता. चोपडा, रूपेश उर्फ भनभन प्रकाश चौधरी रा. श्रीराम नगर भुसावळ आणि चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ लोणारी रा. मोहित नगर भुसावळ यांचा समावेश असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज