fbpx

जळगाव बीएचआर घोटाळ्याप्रकरणी एकाला पुण्यातील हॉटेलमधून अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । राज्यभर गाजत असलेल्या बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव येथील प्रेम नारायण कोकटा नामक संशयीताला पुण्याच्या रिटझ कार्लटॉन या हॉटेलमधून अटक केली असल्याचे समजते.

दरम्यान; बीएचआर प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळपासून जळगाव शहरात ठिय्या मांडून होते. गुरुवारी सकाळपासून पथकाने जळगाव आणि जामनेरमध्ये धरपकड सुरू करून ८-१० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

mi advt

पथकाने जळगाव शहरातून भागवत भंगाळे , पाळधी येथुन जयश्री मणियार, संजय तोतला तर भुसावळ येथील राजकीय पदाधिकारी आसिफ मुन्ना तेली , जामनेर येथील जितेंद्र रमेश पाटील, छगन शामराव झाल्टे, राजेश शांतीलाल लोढा, प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबजी मानकापे (औरंगाबाद)
जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा (जळगाव, यांस पुणे येथील रिट्झ कार्लटन या हॉटेल मधून ताब्यात घेण्यात आले, प्रमोद किसनराव कापसे (अकोला) या बारा जणांना अटक केली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाचवेळी सर्व जणांना ताब्यात घेतले. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई सुरू आहे.

हे देखील वाचा : 

Big Breaking : आमदार रडारवर, ४० जणांचे पथक जळगावात

आमदार पोहचले जिल्हापेठ पोलिसात

Big Breaking : जळगावातील दिग्गज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज