दीड लाखाची बुलेट चोरट्याने लांबविली ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । कुंभारवाडा ( ता. बोदवळ ) येथील शेख इस्त्राईल शेख अस्लम (वय-२४) यांची दीड लाख रूपये किंमतीची बुलेट अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी अस्लम यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर असे की, शेख इस्त्राईल शेख अस्लम (वय-२४) रा. कुंभारवाडा, ता. बोदवड यांच्याकडे एम.एच १९ डी.एन २७७७ क्रमांकाची बुलेट गाडी आहे. २१ ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यांच्या घरासमोर बुलेट मोटारसायकल पार्किंग करून लावली होती. दरम्यान. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बुलेट गाडी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

याप्रकरणी शेख इस्त्राईल शेख अस्लम यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदान सुधाकर शेजोळे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज