ओली पार्टी भोवली ; ‘मजिप्रा’च्या त्या दोघ कर्मचाऱ्यांचं निलंबन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ ऑगस्ट २०२१ ।  नुकतेच पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यंनी ओली पार्टी रंगविल्याचा एक व्हिडीओ काल गुरुवारी व्हायरल झाला होता. दरम्यान, त्या दोघा कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात ओली पार्टी करणी चांगलीच भोवली आहे. ओली पार्टी केल्याप्रकरणी शाखा अभियंता आर. आर. ठाकूर व अनुरेखक हरचंद खंडू हजबन यांना निलंबीत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाशिक कार्यालयातील प्रमुख प्रशांत भामरे यांनी निर्देश जारी केले.

काय होता नेमका प्रकार?

जिल्ह्यात नुकतेच मोठा गाजावाजा करीत पालकमंत्र्यांच्या हस्ते पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातंर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जळगाव, धुळे आणि नंदूरबार या तीन जिल्ह्यांच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. याच कार्यालयात चक्क दारूची मैफील रंगल्याचा खळबळजनक व्हीडीओ व्हायरल झाला होता. टेबलावर दारूची बाटली, सोडा, चखना आणि पॅक भरलेल्या दारूच्या ग्लाससह तीन व्यक्ती दिसून येत होते. याची दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कालच कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या नुसार आज चौकशी करण्यात आली असता मद्य प्राशन करणारी व्यक्ती ही शाखा अभियंता आर.आर. ठाकूर असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाशिक कार्यालयातील प्रमुख प्रशांत भामरे यांनी निर्देश जारी करत मजिप्रा जळगाव कार्यालयाचे शाखा अभियंता आर.आर. ठाकूर व अनुरेखक हरचंद खंडू हजबन यांना निलंबीत करण्याचे आदेश काढले आहेत.  कार्यालयातच मद्य प्राशन करण्याच्या प्रकरणात थेट शाखा अभियंत्यालाच निलंबीत करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -