भरधाव डंपरच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू ; भुसावळातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ शहरातील उड्डाणपुलावर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात वृद्धेचा जागीच मृत्यू झाला तर वृद्धेसोबतचा जावई जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात सरस्वतीबाई मुरलीधर वाघोदे (75, जामनेर रोड, दत्त धाम, भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे जावई सुरेश भोळे हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर सकाळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शहर पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

जावयासोबत येताना सासुचा अपघाती मृत्यू

मयत सरस्वतीबाई वाघोदे या गत आठवड्यात भादली येथे त्यांच्या मुलीकडे गेल्या होत्या. मुलीच्या मुलाचा (नातू) हाताचे ऑपरेशन औरंगाबाद येथे असल्याने त्यांची मुलगी औरंगाबाद येथे गेल्याने सरस्वतीबाई भादलीत मुलीकडे थांबून होत्या. मंगळवार, 26 रोजी सकाळी त्या जावई सुरेश भोळे यांच्यासोबत भुसावळात दुचाकी (एम.एच.19 बी.यु.5997) ने येत असता महामार्गावरील उड्डाणपुलावर दुचाकीला अज्ञात ट्रक चालकाने पाठीमागून धडक दिल्याने सरस्वतीबाई या रोडवर पडल्या व त्यांच्या अंगावर ट्रकची चाके गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला तर सुरेश भोळे हे देखील जखमी झाले.

अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला. मंगळवारी पहाटे सात वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात सरस्वताबाई वाघोदे यांच्या अपघाती मृत्यूनंतर दत्त धाम परीसरात शोककळा पसरली. मयताची औरंगाबाद येथे गेलेल्या कन्येने तत्काळ भुसावळात धाव घेतली तर बडोदा येथील मुलगीही भुसावळात दाखल होत असल्याचे सांगण्यात आले.

सीसीटीव्हीच्या आधारे ट्रक चालकाचा शोध
शहर पोलिसांनी अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात सुरेश भोळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. भोळे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून शहर पोलिसांनी अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रकचा सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे शोध सुरू केला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज