आजाराला कंटाळून वृद्धाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ नोव्हेंबर २०२१ । आजाराला कंटाळून एका ७८ वर्षीय वृद्धाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना यावल तालुक्यातील दहिगाव येथे घडली. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजता उघडकीस आली. निंबा चिंतामण माळी असे मृताचे नाव आहे.

दहिगाव येथील रहिवासी निंबा चिंतामण माळी हे आजाराने त्रस्त होते. याच आजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी दहिगाव गावालगत असलेल्या सुमनबाई पाटील यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आला. यानंतर मृतदेह विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला.

डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला. याप्रकरणी यावल पोलिसांत भिकन माळी यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास हवालदार सिकंदर तडवी, अनिल साळुंके करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज