fbpx

ऑइल टँकरची विझवली आग अन अनर्थ टळला

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ । शहरातील कालिंका माता मंदिर चौफुलीजवळ शुक्रवारी रात्री एका टँकरला अचानक आग लागली. दरम्यान, अग्निशमन दलाचे बंब वेळीच पोहचल्याने अनर्थ टळला आहे.

मनमाड येथील इंडीयन ऑइल प्रकल्पातून टँकर क्रमांक एमएच.४३.०९४९ भरून रविंद्र नरोटे हे नागपूरच्या दिशेने निघाले होते. कालिंका माता चौफुलीच्या पुढे गेल्यावर हॉटेल कमल पॅराडाईजसमोर टँकरमधून अचानक धूर येऊन आग लागली. घटनेची माहिती मिळताच लागलीच शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि जळगाव मनपाच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी बंब घेऊन पोहचले. 

जळगाव अग्निशमन दलाचे वाहन चालक प्रकाश चव्हाण, राजमल पाटील, गंगाधर कोळी, पन्नालाल सोनवणे, जगदीश खडके, नितीन बारी, वाहन चालक देविदास सुरवाडे, संतोष पाटील, मोहन भाकरे, वाहन चालक निवांत इंगळे, वाहन चालक भारत छापरिया, प्रकाश सोनवणे, मदन जराळ आदींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. टँकरची आग पूर्ण विझल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज