fbpx

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । शोषितांचे आक्रोश कादंबरी, पोवाड्यातून मांडणारे लोकशाहीर, साहित्यसम्राट व लोककलेचे उपासक अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे काल रविवार, दि. 1 ऑगस्ट 2021 रोजी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी नेरी नाका परिसरातील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले.

जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, रमाबाई ढिवरे, मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे, प्रतिभा भालेराव, किरण अडकमोल, प्रताप बनसोडे, प्रवीण परदेशी, मोहन चव्हाण, बापू थोरात, ओम थोरात, नरेंद्र मोरे, दादा राठोड, नारायण अटकोरे, मनोज अडकमोल, किरण कोळी आदी उपस्थित होते.

दरम्यान, अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे जळगावातील पाईक सागर आंबोरे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 26 जुलै 2021 रोजी ‘महापौर सेवा कक्षा’कडे नेरी नाका परिसरातील अण्णा भाऊ साठे चौक परिसरात कमालीची अस्वच्छता निर्माण झालेली असल्याने हा परिसर संपूर्णपणे स्वच्छ करण्यात येऊन या भागाचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी तक्रार नोंदविली होती.

त्यानंतर यासंदर्भात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनीही तत्काळ पुढाकार घेतला व ही तक्रार जळगाव शहर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे अधिकारी काशिनाथ बडगुजर यांच्याकडे पाठविली असता 27 जुलै 2021 रोजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ या परिसराला भेट देऊन तेथील संपूर्णपणे स्वच्छता केली. त्यानंतर पुतळा परिसरातील भिंतीची डागडुजी व दुरुस्ती करून रंग देण्यासह सुशोभीकरण करून तक्रारीचे निवारण करण्यात आले. याबद्दल श्री.आंबोरे व कार्यकर्त्यांनी महापौरांसह महापालिका कर्मचार्‍यांप्रती समाधान व्यक्त केले व विशेष धन्यवाद दिले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt