fbpx

आषाढी निमित्त तामसवाडी मंदिरात आ.चौधरींच्या हस्ते साबुदाणा खिचडी व केळी वाटप

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । आषाढी एकादशी निमित्तानं रावेर यावल विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी यांनी तालुक्यातील तामसवाडी येथील प्रसिद्ध मंदिरात माता रुक्मिणी चरणी वंदन केलं असून समस्त वारकरी बांधवांना, तालुक्यातील नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाविक व भक्तांना फराळाचे वाटप केले

आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप 

रावेर तालुक्यातील तामसवाडी येथील प्रसिद्ध मंदिरात रावेर काँग्रेस तर्फे भाविकांना साबुदाणा खिचडी व केळी वाटप करण्यात आली. येथे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त मोठया संख्येत भाविक येत असतात परंतु कोरोना मुळे भक्त संख्या मोजकी आहे कोरोनाचे पालन करून याठिकाणी खिचडी व केळी वाटप करण्यात आली

आमदार शिरीष चौधरी यांनी केली प्रार्थना  

रावेर यावल तालुक्याचे आमदार चौधरी यांनी तामसवाडी मंदिरात विठुरायाच्या चरिणी प्रार्थना करून “यंदा राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे. माझ्या तालुक्यातील बळीराजा सुखी होऊदे. त्याच्या शेतशिवारात, घराघरात धनधान्याची, दूधदुभत्याची समृद्धी येऊदे. बा पांडुरंगा, जगावर आलेलं करोना महामारीचं संकट लवकर दूर कर. सर्वांना निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी ठेव”, असं साकडं यानिमित्त प्रदेशध्यक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी बा पांडुरंग आणि माता रुक्मिणी चरणी अशी प्रार्थना केली

यांची होती उपस्थिती

आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, शहर अध्यक्ष संतोष पाटील, मुजलवाडी सरपंच योगेश पाटील, दिलरुबाब तडवी, सूर्यभान चौधरी, सुरेश चिंधु पाटील, महेंद्र पवार,संजय चौधरी, श्रीमती कांता बोरा, सौ मनीषा पाचपांडे,सौ मानसी पवार,सौ रुपाली परदेशी,ललित पाटील,महेश लोखंडे,जीवन गांगवे, किरण पाटील,प्रवीण पाटील यांच्या प्रमुख उपस्थित  साबुदाणा खिचडी,व केळी वाटप करण्यात आली. ह्या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश्वर महाजन,सरपंच योगेश पाटील, संतोष पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज