नूतन मराठा भरती प्रकरण : प्राचार्य डॉ.एल.पी.देशुमुख नॉट रीचेबल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयात दि.१९ रोजी एका मस्टरवर सह्या करताना काही जणांना स्व.नरेंद्र अण्णा गटाने रंगेहाथ पकडले होते. जिल्हापेठ पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, प्राचार्य एल.पी.देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रीचेबल मिळून आले.

१९ जून रोजी नूतन मराठा महाविद्यालयात ७ लोक गेल्या चार वर्षापासून महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा देत असल्याचे भासवून मस्टरवर एकाच दिवशी सह्या करताना त्यांना संस्थेचे प्रभारी अध्यक्ष ॲड.विजय भास्करराव पाटील यांनी रंगेहात पकडले होते. यासंबंधी पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून तपास करून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसात भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० प्रमाणे कलम १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात गंभीर व महत्त्वपूर्ण कलमांचा समावेश करण्यात आला असून यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य वाढले आहे. काही कलम अजामीनपात्र असल्याने संशयितांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. गुन्ह्यात अद्याप कुणीही अटकपूर्व जामीन घेतलेला नसून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

नरेंद्र अण्णा गटाकडून अटकेसाठी मोर्चेबांधणी

स्व.नरेंद्र अण्णा पाटील गटाकडून संशयितांना अटक करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असल्याची चर्चा आहे. यासाठी ॲड.पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली असल्याचे कळते.

४ कायम कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात

गुन्ह्यांमध्ये संशयीत असलेले ४ कर्मचारी हे संस्थेचे कायम कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, उपप्राचार्य ए.बी.वाघ, शिवराज मानके – पाटील, पी.ए.पाटील यांचा समावेश आहे. गुन्ह्यात संशयितांना अटक झाल्यास व २४ तासापेक्षा जास्त वेळ त्यांना कारागृहात राहावे लागल्यास त्यांच्या नोकरीचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणात प्राचार्य एल.पी.देशमुख हे जरी नॉटरिचेबल आहेत. पोलीस सर्व संशयितांचा शोध घेत आहे. परंतु ते आढळून येत नाही आहेत. आरोपींना अटक झाल्यास त्यांचे नोकरीचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar