आता सर्व चतुर्थश्रेणी कर्मचारी उपभोगणार शासकीय सुट्ट्या

 

जळगाव लाईव्ह न्युज | २४ सप्टेंबर २०२१ | महानगरपालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना म्हणजेच सफाई कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तो म्हणजे, या सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्ट्यांचा लाभ घेता येणार आहे. नगरसेवक चेतन सनकत यांनी भारती सोनवणे महापौर आणि अश्विन सोनवणे उपमहापौर असताना महासभेत हा विषय मांडला होता.

शासन नियम कलम 44 अंतर्गत 2016 पासून राज्यातील सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्टी देण्यात यावी असे सांगण्यात आले होते. मात्र जळगाव शहर महानगर पालिकेमध्ये अशी सुट्टी या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना देण्यात येत नव्हती. मात्र आता सनकत त्यांनी महानगरपालिकेच्या महासभेत उपस्थित केलेल्या प्रश्न अन्वये १ ऑक्टोबर २०२१ या सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्ट्यांचा लाभ घेता येणार आहे.

शनिवार रविवार देखील असणार सुट्टी
महानगरपालिकेत काम करत असलेल्या सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना शनिवार रविवार सकट सर्व शासकीय सुट्ट्यांवेळी सुट्टी चा लाभ घेता येणार आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज