आणखी १० एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मुदतीतही कामावर रूजू न होता, आंदोलन सुरूच ठेवले असल्यामुळे एस.टी. महामंडळातर्फे या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.असून,आतापर्यंत जळगाव विभागातील ३२ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजाविण्यात आली आहे.

सोमवारी जिल्ह्यातील विविध आगारांतील संपावर बसलेल्या १० कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजाविण्यात आली आहे. आतापर्यंत जळगाव विभागातील ३२ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजाविण्यात आली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर, त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या या कारवाईबाबत आठ दिवसांत खुलासा मागविला आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, विलीनीकरणाच्या मागणीबाबत न्यायालयात सोमवारी होणारी सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता २२ डिसेंबर रोजी होणार असून, न्यायालयातर्फे काय निकाल देण्यात येतो, याकडे संपकरी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -