विद्यार्थ्यांना सूचना : एमबीए, एमसीए प्रवेशासाठी यंदा दोनच कॅप राउंड होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ ।  एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रसिद्ध झाले आहे. या दोन्ही शिक्षणक्रमांसाठी यंदा दोनच कॅप राउंड होणार असून, २० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज करावा लागेल.

सी-मॅट, कॅट व महाराष्ट्र एमबीए, एमएमएस सीईटी यावर्षी एमबीए प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे संकेतस्थळावर नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एमबीए महासीईटी, सीमॅट, कॅट तसेच एमसीए महासीईटी दिलेली असेल, त्यांच्यासाठी प्रमाणपत्रे ऑनलाइन अपलोड करणे व अर्ज भरण्याची प्रक्रिया संकेतस्थळावर सुरु आहे. कॅप फेरी अंतर्गत जर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाही, तर फ्रीशीप, स्कॉलरशिप मिळणार नाही.

अशी होईल प्रवेशप्रक्रिया, विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी

यास सुरुवातीला प्रवेश प्रक्रियेतील टप्पे त्यानंतर सुरुवातीला एमबीए तारीख कंसात एमसीएची तारीख आहे. ऑनलाईन नोंदणी, प्रमाणपत्रे अपलोड व छाननी एमबीएसाठी २० नोव्हेंबर (एमसीएसाठी २० नोव्हेंबर), तात्पुरती गुणवत्ता यादी २२ नोव्हेंबर (२३ नोव्हेंबर), यादी संर्दभात हरकती २३ ते २५ नोव्हेंबर (२४ ते २५ नोव्हेंबर), अंतिम गुणवत्तायादी २६ नोव्हेंबर (२६ नोव्हेंबर), कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म २७ ते २९ नोव्हेंबर (२९ ते २९ नोव्हेंबर), कॅपराऊंड एकचे वाटप २ डिसेंबर (१ डिसेंबर), निवड झालेल्या विद्यार्थांचे प्रवेश ३ ते ५ डिसेंबर (२ ते ५ डिसेंबर), दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा ६ डिसेंबर (६ डिसेंबर), दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे ७ ते ९ डिसेंबर (७ ते९ डिसेंबर), दुसऱ्या फेरीसाठी जागावाटप १२ डिसेंबर (१२ डिसेंबर), प्रवेश घेणे १३ ते १५ डिसेंबर (१२ ते १४ डिसेंबर). त्यांच्यासाठी प्रमाणपत्रे ऑनलाइन अपलोड करणे व अर्ज भरण्याची प्रक्रिया संकेतस्थळावर सुरु आहे. कॅप फेरी अंतर्गत जर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाही, तर फ्रीशीप, स्कॉलरशिप मिळणार नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज