fbpx

उत्तर महाराष्ट्रातील दोन महिलांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जुलै २०२१ । केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असून यासंदर्भात गेल्या काही दिवसापासून देशभरातील विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्राला मोठी संधी मिळणार असून दोन महिलांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून बढती होणार आहे.

केंद्र सरकार आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करीत असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. मंत्रिमंडळात नवीन चेहरे देताना विशेषता अभ्यासू आणि तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातून दोन चेहऱ्यांना राज्यमंत्री पद मिळणार असल्याचे विश्वसनीय वृत्त असून त्यात दोन्ही महिला असल्याचे समजते.

उत्तर महाराष्ट्रातून नंदुरबारच्या खासदार डॉ.हिना गावित तर रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा आहे. दोन्ही महिला खासदार अभ्यास यासून दुसऱ्यांदा भरघोस मताधिक्क्याने निवडून संसदेत पोहचल्या आहेत. दोन्ही खासदारांचा मतदार संघातील विकासकामांचा आणि जनसंपर्काचा लेखाजोखा तपासला असता तो दमदार आहे. 

दिंडोरी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या डॉ.भारती पवार यांचे देखील नाव चर्चेत असून त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. उत्तर महाराष्ट्रातून या दोन्ही महिला खासदारांना केंद्राने राज्य  मंत्रीपद दिले तर गेल्या वर्षभरात पक्षाची उत्तर महाराष्ट्रात होत असलेली पडझड रोखण्यास काहीसा हातभार लागणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt