⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | इपीएस ९५ पेन्शनर्सचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय मेळावा जळगावात संपन्न!

इपीएस ९५ पेन्शनर्सचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय मेळावा जळगावात संपन्न!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । दि १२ जुलै रोजी जळगाव येथे राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तर जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत इपीएस ९५ पेन्शनर्सचा उत्तर महाराष्ट्र स्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यास शहराच्या माजी महापौर सीमा भोळे यांची देखील उपस्थिती पार लाभली.

यावेळी माहिती देताना कमांडर राऊत यांनी, १) किमान पेन्शन रु साडेसात हजार अधीक महागाई भत्ता, २) पेन्शनर व त्याच्या पत्नीस मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात. तसेच इतर महत्वाच्या मागण्या साठी आजपर्यंत देश पातळीवर आंदोलन सुरू आहे. खासदार हेमामालिनी यांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन देवून सुद्धा नोकरशाही त्यात आडकाठी घालत आह. म्हणून पेन्शनर्सचा संयम सुटलेला असून ते मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे. त्यासाठी ३१ जुलै २०२४ व १ ऑगस्ट २०२४ रोजी जंतर मंतर नवी दिल्ली येथे फार मोठे आंदोलन केले जाणार आह असे प्रतिपादन कमांडर अशोक राऊत यांनी केले.

सदर प्रसंगी मा खासदार सौ स्मिता ताई वाघ यांनी तुमचा प्रश्न गंभीर असून मी त्याचा अभ्यास करून नक्की आपल्या पाठीशी उभी राहीन असे आश्वासन दिले. या वेळी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील प्रतिनिधी यांनी जोरदार अभ्यासपूर्ण भाषणे केली. प्रामुख्याने राष्ट्रीय महासचिव श्री विरेंद्रसिंग राजावत राष्ट्रीय महिला अध्यक्ष शोभाताई आरास ,पश्चिच भारत संघटिका सौ.सरिता ताई नारखेडे ,पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर , महाराष्ट्र उपाध्यक्षा श्रीमती आशाताई शिंदे, महाराष्ट्र सचिव, सुधीर चांडगे, उप-सचिव हरीभाऊ व्यवहारे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग अण्णा जाधव, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नारायण होन यांचा समावेश होता. मेळाव्यासाठी जळगांव सह धुळे ,नंदुरबार, नगर या जिल्ह्यातील पेन्शनर मोठ्या संखेने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन जळगांव जिल्हाध्यक्ष अरविंद भारंबे ,रमेश नेमाडे, दिनकर पाटील कौतिक किरंगे, मिठाराम सरोदे, यु डी चौधरी यांनी केले.

मेळाव्याच्या यशस्वितेसाठी जामनेर तालुका भुसावळ भुसावळ तालुका, यावल फैजपूर तालुका टिम्सने जीवापाड मेहनत घेतली,येथील श्री सुरेश महाजन आणी सहकारी मंडळाने सुंदर भक्तीगीते सादर केलीत एकुणच यावल ,चाळीसगांव ,अमळनेर भडगाव, पाचोरा, फैजपूर असे सुमारे दिड हजार पेक्षा जास्त पेन्शनर हजर होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री संजीव खडसे यांनी केले. विशेष आभार लाड वंजारी समाज मंगल कार्यालय व्यवस्थापनाने लग्नाचा सिझन असतांना देखील समाज कार्य म्हणून अत्यंत वाजवी दरात कार्यालय उपलब्ध करून दिले त्यांचे आभार मानणे हे कमीच आहे त्यांच्या ऋणात रहाणे आम्ही पसंत करतो. शहरातील पत्रकार बांधवांनी देखील मेळाव्यास व्यापक प्रसिद्धी दिली आम्ही त्यांचे देखील ऋणी आहोत. शेवटी मिठाराम सरोदे यांनी सर्वाचे आभार मानले

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.