fbpx

महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मोफत मिळणार सातबारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । जमिनीचा सातबारा उतारा हा सामान्य शेतकरी व नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. हाच सातबारा उतारा घेऊन आता शासनाचा महसूल विभाग शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या दारात जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आता त्यांचा ७/१२ उतारा मोफत वाटप करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. उत्तर महाराष्ट्रात ४१, लाख ७८ हजार ३२९ कृषक खातेधारक असून नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने पहिल्यांदा राज्य शासनासमोर हा विषय मांडला होता.

तो शासनाने मान्य केला असून राज्यभरातील शेतकऱ्यांना मोफत सातबारा उतारा वाटपाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते सुरुवात झाली.

mi advt

सातबारा उताऱ्यावर जमिनीची धारणाधिकार पद्धत, एकूण क्षेत्र, गट क्रमांक यासह पोटखराबा आणि इतर महत्त्वाच्या नोंदी, इतर हक्कातही कर्ज, बोजा, विहिरी यासारख्या नोंदी असतात. राज्य शासनाने उताऱ्याच्या संगणकिकरणाचे काम जवळपास पूर्ण केले असून आता शेतजमिनीबाबत अनेक बाबी ऑनलाईन केलेल्या आहेत.

जिल्हानिहाय सात बारा

नगर -१३, ७४,८८२
नाशिक – १०, ५३०९५
जळगांव -१२,१७,५८८
धुळे – ३,१३,२७२
नंदुरबार -२,१९,४९२
विभाग – ४१,७८,३२९

विभागात आज अखेर १ लाख ४६ हजार ९१८ इतक्या सातबारा उताऱ्यांचे मोफत वाटप पूर्ण झाले असून उर्वरित उताऱ्यांचे वाटपही लवकरच पूर्ण होईल. शेतकऱ्यांना मोफत सातबारा उतारे वाटप केल्यामुळे जमिनीच्या अभिलेखातील त्रुटी दूर करुन सर्व अभिलेख परिपूर्ण व अद्ययावत करण्यास यामुळे मदत होईल. जमिनीविषयी वाद व तंटे कमी होण्यास मदत होईल.
– राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज