fbpx

जळगाव शहरातून आमदारकी लढविण्याबाबत काय म्हणाले नितीन लढ्ढा?

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२१ । जळगाव शहरात गेल्या सात टर्मपासून मी आणि माझी पत्नी मनपा निवडणूक लढवीत आहोत. आजवर जळगावकरांची सेवा करायची हेच ध्येय मनात ठेवून आम्ही काम करीत आहोत. सेवेचे व्रत हाती घेतल्यावर मग ते पद कुठलेही असो काम करण्याचा आनंद येतो. जळगावकरांची सेवा करताना आमदार म्हणून काम करण्यापेक्षा मनपात राहून जास्त कार्य करता येईल असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी केले.

जळगाव लाईव्ह न्युज घेतलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. जळगाव शहर शिवसेनेत सध्या सुरु असलेल्या गटबाजी आणि नाराजी नाट्यच्या पार्श्वभूमीवर जळगाव लाईव्हने नितीन लढ्ढा यांच्याशी संवाद साधला. नितीन लढ्ढा म्हणाले की, शहर शिवसेनेत कोणतीही नाराजी नसून कुठले गट नाहीत. शिवसेना हा पक्ष आदेशावर चालणारा असून पक्षाच्या आदेशानेच विराज कावडीया यांची निवड करण्यात आली आहे. विराज देखील शिवसैनिक असून त्यांनी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. पक्षाकडून एका युवा चेहऱ्याला संधी देण्याचा हा प्रयत्न आहे. शिवसेनेत जुन्या आणि नवीन कार्यकर्ते असे काही प्रकार असल्याचे माध्यमातून वाचायला मिळाले परंतु जुने नवीन कार्यकर्ते हा प्रकार आजपर्यंत समजलाच नाही. तांदळात ज्याप्रकारे विविध प्रकार असतात ते समजू शकतो परंतु कार्यकर्ते जुने आणि नवीन कसे होऊ शकतात, असे ते म्हणाले.

एकनाथराव खडसे हे ज्येष्ठ आणि मित्र पक्षाचे नेते असून महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते हे जळगाव मनपातील कामासंदर्भात त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात त्यात वावगे काही नाही. शहरातील प्रश्न ते त्याठिकाणी मांडतात आणि त्यावर चर्चा करतात. जळगाव शहरात तीस वर्ष जेष्ठ मार्गदर्शक सुरेशदादा जैन यांचे शहरावर लक्ष होते. सध्या सुरेशदादा जैन हे मनपात आणि शहरात नसल्याने त्यांच्या मार्गदर्शनाची उणीव जाणवत असल्याची खंत नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज