fbpx

अखेर चाळीसगाव नगरपालिकेला मिळाले पुर्णवेळ मुख्याधिकारी

नितीन कापडणीस यांनी स्विकारला पदभार

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । सहा महिने प्रतिक्षा करावी लागल्यानंतर चाळीसगाव नगरपरिषदेला अखेर पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले आहेत.मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त असलेले नितिन कापडणीस यांची नियुक्ती चाळीसगाव न.पा.च्या मुख्याधिकारी पदी करण्यात आली आहे.

गेल्या सहा महिन्यापूर्वी तात्कालीन मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांच्या बदलीनतंर हे पद रिक्त असून प्रभारी मुख्याधिकारी म्हणून भडगावचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्याकडे कार्यभार होता.पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरात विविध विकास कामांबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.

आता मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांच्या नियुक्तीमुळे शहरातील विकास कामांना चालना मिळणार आहे.लवकरात लवकर नूतन मुख्याधिकारींनी शहरात विविध विकासकामांचा आढावा घेऊन कामांना गती देण्यासाठी प्रयत्न करावे व शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी अपेक्षा चाळीसगाव शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज