fbpx

इनरव्हील क्लब जळगाव लिस्टच्या अध्यक्षपदाचा नीता परमार यांनी पदभार स्वीकारला

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ । जळगाव येथील इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून नूतन अध्यक्षा नीता राजेश परमार यांनी मावळत्या अध्यक्ष प्रीती दोषी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी दातांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉ. अनुराधा वानखडे राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

इनरवहील क्लब ऑफ जळगांव ईस्टच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे असोसिएशनचे कोषाध्यक्ष मीनल लाठी, डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी आणि मुख्य अतिथी डॉ. अनुराधा वानखडे राऊत होते. सुरुवातीला मावळत्या अध्यक्षा प्रीती दोषी यांनी नूतन अध्यक्षा नीता राजेश परमार यांना अध्यक्षपदाचा पदभार सोपविला. नूतन अध्यक्षा नीता परमार यांनी नवीन कार्यकारिणीची ओळख करून दिली. यात उपाध्यक्षा कार्तिकी शाह,  सचिव बबिता मंधान, कोषाध्यक्ष दीपा टिब्रेवाल, आयएसओ दिशा अग्रवाल, सीसी भावना चौहान,  मार्गदर्शक पूर्व अध्यक्षा संगीता तोतला,  डॉ. सुनीता पाटील, सीसीसी म्हणून पूर्व अध्यक्षा तरूणा अग्रवाल, कार्याध्यक्ष आशा गादिया, ईशा गोयंका, कीर्ती काबरा,  ममता चौबे, कविता कराचीवाला यांची नियुक्ती करण्यात आली.

या प्रसंगी नवीन १० सदस्यानी इनरव्हीलमध्ये प्रवेश घेतला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. अनुराधा वानखडे राऊत यांनी, दाताचे विकार आणि आजारबाबत माहिती दिली.   तसेच वैद्यकीय उपक्रमाविषयी सांगितले. अश्विनी गुजराती यांनी आम्हाला डिस्ट्रिक्ट गोल आणि थीम संदर्भात होणाऱ्या उपक्रमात बदल याविषयी माहिती दिली.  मीनल लाठी यांनी इंनरव्हील संस्थेविषयी माहिती दिली. स्त्री शक्ती ॲप जे इनरव्हील तयार करणार आहे त्याबदल मार्गर्शन केले.

नवीन अध्यक्षा नीता परमार यांनी आगामी उपक्रमांविषयी माहिती दिली.  सूत्रसंचालन शिल्पा चोरडिया यांनी  आणि आभार प्रदर्शन रुची मणियार यांनी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज