जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथे शॉट सर्किटमुळे आग लागून ९ बिघा शेतातील ऊस जळून शेतकऱ्याचे तब्बल ७ लाख ४० हजाराचे नुकसान झाले.
या संदर्भात गोकुळ पाटील (वय ४८ रा. वाघळुद बुद्रूक, ता. धरणगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या भावाच्या नावे वाघळुद बु. शिवारातील वाघळूद-बोरखेडा शिव रस्त्यालगत शेत गट नं. ६९/३,६९/४,६९/५ मध्ये ९ बिघे शेत आहे.
या शेतात त्यांनी ऊस लावलेला होता. २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ईलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट होऊन आगीत ऊस जळून खाक झाला. यात अंदाजे ७ लाख ४० हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कर्मचारी मोती पवार करत आहेत.
हे देखील वाचा :
- जळगावात ढगाळ वातावरणामुळे उकाडा पुन्हा वाढला, आज जिल्ह्यात पूर्वमाेसमी पावसाची शक्यता
- राज्यमंत्री बच्चु कडु उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, असे आहे दौऱ्याचे नियोजन
- जुन्या वादातून ७७वर्षीय वयोवृद्धाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी
- प्रवाशांनो लक्ष द्या : मनमाड-मुंबई, जनशताब्दी गाड्या रद्द
- विज पडुन जिवीत हानी होऊ नये यासाठी ‘दामिनी’ ॲप डाउनलोड करा
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज