एरंडोल येथे शिवसेनेच्या वतीने निलेश राणे यांचा पुतळा दहन

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल येथील धरणगाव चौफुली वर राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव  पाटील यांच्या संदर्भात भाजपाचे प्रदेश सचिव निलेश नारायण राणे यांनी काल अतिशय खालच्या दर्जाचे आक्षेपार्ह ट्विट केले. त्या निषेधार्थ आज एरंडोल शहर शिवसेना व युवासेनेच्या वतीने निलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी निलेश राणे यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.याप्रसंगी बोलताना तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन यांनी निलेश राणे यांच्यावर जोरदार प्रहार करताना सांगितले की निलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत, एका जबाबदार लोकप्रतिनिधी विषयी बोलताना एवढ्या हीन पातळीवर वक्तव्य करणे अतिशय निंदनीय आहे, तथापि राणे कुटुंबीयांकडून सुसंस्कृत पणाची अपेक्षा तरी कशी धरता येईल. राणे कुटुंबीयांनी कोणावरही टीका करताना आपला भूतकाळ विसरू नये आज जे काही त्यांच्याकडे आहे ते फक्त आणि फक्त शिवसेनेच्या जोरावर हे त्यांनी विसरू नये.यावेळी काहीकाळ रास्तारोको देखील करण्यात आला.

याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.तुषार देवरे यांच्याकडे निलेश राणे यांच्या विरोधात फिर्याद देण्यात येऊन योग्य ती कारवाई करून अटकेची मागणी करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, तालुका संघटक माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, नगरसेवक चिंतामण पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य आनंदा चौधरी, माजी नगरसेवक सुनील चौधरी, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, राजेंद्र महाजन, परेश बिर्ला, विकी खोकरे, सुनील चौधरी, ऍड. प्रेमराज पाटील, अमोल भावसार, कुणाल पाटील, मोहन महाजन, प्रसाद महाजन, राजेश महाजन, जयेश महाजन, गणेश चौधरी, गोविंदा बिर्ला, चेतन महाजन, राजू महाजन, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज