fbpx

निखिल वागळेंनी खा.उन्मेष पाटलांना फटकारले, वाचा काय म्हणाले ते..

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहर लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील आणि जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यात सध्या ट्विटर युद्ध सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेल्या ट्विटला वागळे यांनी उत्तर दिले असता त्यावर पुन्हा खा.उन्मेष पाटील यांनी उत्तर दिले. त्यानंतर ‘मोदींची चमचेगिरी बंद करा. हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे!, अशा शब्दात वागळे यांनी फटकारले आहे.

जळगावचे खा.उन्मेष पाटील यांनी आज सकाळी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ट्विट केले. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेबांच्या नेतृत्वमध्ये देश आत्मनिर्भर होऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. व्यापारी सुज्ञ आहेत महाराष्ट्र बंद होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये महापूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या शेतकरी बांधवांना आजपावेतो कोणतीही मदत देण्यात आलेले नाही? असे ट्विट केले होते. त्यावर उत्तर देतं ‘व्यापारी स्वार्थी आहेत. भाजपचे गुलाम आहेत. त्यांना वठणीवर आणलं पाहिजे. शेतकरी नसतील तर तुम्ही कसे जेवू शकाल? मोदी घालतील का जेवायला?’ असा प्रश्नार्थक टोला निखिल वागळे यांनी लगावला आहे.

mi advt

खा.उन्मेष पाटील यांनी यांनी आणखी एक ट्विट केले असून ‘चमकोगिरी तथाकथित लोक करतात आम्ही नाही. राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एक रुपया मिळालेला नाही ते द्यायला सांगा विरोधाभास डोक्यातून काढून टाका’ असे म्हटले आहे. त्यावर उत्तर देताना ‘मोदींची चमचेगिरी बंद करा. हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे!’ अशा शब्दात त्यांनी फटकारले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज