मुंबई हल्ल्यातील शहिदांना सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनने वाहिली श्रद्धांजली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, सैनिक व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे भिलपुरा येथील इमाम अहेमद रझा चौकात ‘शहीदो को सलाम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे हे होते. यावेळी आयोजक अयाज अली नियाज अली व पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी मनोगत व्यक्त करताना, २६/११ च्या मुंबई हल्याप्रसंगी उद्भवलेली कठीण परिस्थिती व त्यानंतर आपल्या वीर जवानांनी दाखविलेले अफाट शौर्य, साहस संपूर्ण जगाने पाहिले आहे. म्हणून आज (दि.२६) आपण सर्व शहिदांना सलाम करतो, असे सांगितले. यावेळी उपस्थितांनी हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन व दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनचे अयाज अली नियाज अली, सुरज गुप्ता, हाजी नासिर अली, युनूस खान, हाजी मोइनुद्दिन शेख, मोहम्मद खान, शेख जलालुद्दीन, शेख शफी, शेख मुजफ्फर, इलियास नूरी, सलमान मेहबूब, तारीफ मुनाफ, शकूर बादशहा, योगेश मराठे, सय्यद असिफ, शेख आवेश, शाकीर फारुख, गुड्डू कुरेशी, जीशान हुसेन, नाझीम कुरेशी, अता मोइन अली, जावेद बागवान, टिपू रंगरेझ, तौहीद कुरेशी आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -